NAGPUR
श्रीमद् अनंत व्रत पूजन ते जीवनाचे सार्थक होते
नागपूर, महाराष्ट्र खबर24.समर्थ सद्गुरु श्री संत भागवत भूषण ब्रह्मचारी मोहन महाराज कठाळे प्रणित श्री सद्गुरु सेवा परिवार ट्रस्ट द्वारे नागपूर, यवतमाळ, पुणे तसेच बारामती, वालचंदनगर, दौंड, दारव्हा, कोल्हापूर सातेफळ,येथे सामुदायिक श्रीमद् अनंत व्रत पूजन करण्यात येते . सद्गुरूंनी सांगितल्या प्रमाणे जीवनात सकल समृध्दी, ऐश्वर्य, समाधान, कीर्ती, लाभ , विनय इत्यादी अनेक सद्गुण या व्रताचे आचरण केल्याने सहजच प्राप्त होतात, व उत्तरोत्तर सद्गुरूंची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो व जीवनाचे सार्थक होते.म्हणूनच खूप मनपूर्वक हे व्रत सकल शिष्यांनी आवश्य करावे.आज महाराज यांचे शिष्य परिवारात गावोगावी हे व्रत केलं जातं. जवळपास आज पर्यंत या व्रताचे पालन करणाऱ्यांची संख्या ५०० वर आहे.
सद्गुरू महाराज सांगतात _
‘ ‘ श्रीमद अनंत म्हणजे साक्षात श्री भुदेवी व श्रीदेवी सहित श्री व्यंकटेश भगवान
म्हणून आपल्या हाताला जो अनंत दोरक बांधला जातो त्याचे श्रध्दापूर्वक पूजन करावयास हवे त्याचे पावित्र्य जपावयास हवे
या अनंताच्या पूजेचा श्रीगुरुचरित्रात तसेच इतर पुराण ग्रंथात उल्लेख आहे। अनंत पूजनाच्या व्रताने उत्तम वैभव, समृद्धी समाधान प्राप्त होते, अंखंड लक्ष्मी कारक ,आरोग्य कारक ,असे हे व्रत सर्वांनी करण्या योग्य आहे हीच गुरुकृपा देखील होय.(सहज सोपान)
म्हणून हे व्रत करावयास हवे
आपल्या ला जे सदगुरू श्री मोहन महाराज यांचे कडून जे अनंत व्रत मिळाले आहे ती परंपरा फार मोठी आहे श्री स्वामी समर्थ_श्री संत साई बाबा_श्री संत उपासनी महाराज_परम पूज्य गोदावरी माता_परम दयाळू गुरूदेव श्री संत मोहन महाराज _ आपण सर्व गुरुबंधू
पराग महाराज यांच्या मार्गदर्शनात
वें मू श्री संजय शास्त्री करकरे यांच्या पौरोहित्य द्वारें हे नागपूर येथील व्रत श्री बालाजी मंदीर बेसा येथे संपन्न झाले श्री बालाजी मंदीर ट्रस्ट चे सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले.